Beed Crime | केजमध्ये एकाच दुकानात अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी; पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान

शहरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
Beed Crime | केजमध्ये एकाच दुकानात अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी; पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान
Pudhari
Published on
Updated on

Shop looted in Kej

केज : केज शहरात एकाच दुकानात अवघ्या महिनाभराच्या अंतराने सलग दुसऱ्यांदा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

केज तालुक्यातील सारणी (आ.) येथील कमलाकर महादेव सोनवणे (रा. धारूर रोड, केज) यांचे मंगळवार पेठ कॉर्नर येथे ‘न्यू गजानन अ‍ॅग्रो ट्रेडर्स कृषी सेवा अ‍ॅन्ड मशीनरी’ नावाचे कृषी सेवा व मशिनरीचे दुकान आहे.

Beed Crime | केजमध्ये एकाच दुकानात अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी; पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान
Beed News : दीपमाळेच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात

दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता दुकान बंद केल्यानंतर रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी शटरला आतून लावलेले नट-बोल्ट काढले तसेच दुकानाच्या भिंतीच्या वरच्या बाजूस असलेला लोखंडी पत्रा कापून दुकानात प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातून

  • ५ एचपी सीआय कंपनीची १ पाण्याची मोटार – ₹१३,३५०

  • ५ एचपी सीआय कंपनीची १ पाण्याची मोटार – ₹२१,१२०

  • ३ एचपी लक्ष्मी कंपनीच्या २ पाणबुडी मोटारी – ₹२९,०००

  • फ्यूज व इतर साहित्य – ₹४,८५१

असा एकूण ₹६८,३२१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Beed Crime | केजमध्ये एकाच दुकानात अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी; पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान
Beed Crime News : दारू पाजून चुलत भावाचा केला खून

या प्रकरणी कमलाकर सोनवणे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४६/२०२६, भा. न्या. सं. ३३१(४), ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने करीत आहेत.

एकाच दुकानात महिनाभरात दुसरी चोरी

विशेष म्हणजे, याच दुकानात यापूर्वीही दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९ वाजता चोरी झाली होती. त्या वेळी चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश केला होता.

Beed Crime | केजमध्ये एकाच दुकानात अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी; पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान
Beed Crime | ऊस तोडणीसाठी गेलेल्या पारधी समाजातील तरुणांना जबर मारहाण

त्या चोरीत

  • ४ एमएम केबल वायर (५०० मीटर) – ₹५०,०००

  • २.५ एमएम केबल वायर (३५० मीटर) – ₹२६,२५०

  • ३ एचपीच्या २ मोटारी – ₹२७,०००

  • अर्धा व १ एचपीच्या २ मोटारी – ₹४,५००

  • ३ पेरणी यंत्र – ₹१९,५००

  • ३ प्लॅन लेटर बंडल – ₹६,०००

  • ५ स्टार्टर – ₹६,२५०

  • २० ऑटो स्विच – ₹८,०००

  • २ पेटी बायोपोनिक – ₹९,०००

  • ५ बायोपावर बकेट – ₹४,७५०

असा एकूण ₹१,६१,२५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ७०९/२०२५, भा. न्या. सं. ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने करीत आहेत.

व्यापाऱ्यांमध्ये भीती, पोलिसांसमोर आव्हान

अवघ्या एक महिना दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा त्याच दुकानात, त्याच पद्धतीने चोरी झाल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत असून, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर तातडीने आळा घालण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news