Bhokardan : आघाडीत बिघाडी तर महायुतीही फिस्कटली File photo
जालना

Bhokardan : आघाडीत बिघाडी तर महायुतीही फिस्कटली

भोकरदन : शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी १२ अर्ज

पुढारी वृत्तसेवा

Bhokardan: 12 applications for the post of mayor on the last day

रवींद्र देशपांडे

भोकरदन : स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीतील प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आघाडीत बिघाडी आणि महायुतीही फिस्कटल्याने मित्र पक्ष नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. अर्ज शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सुमारे १२ उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले.

तर सदस्यपदासाठी १५४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सादर करण्याच्या भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये सूर जुळले नाही. तीच परिस्थिती राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र पक्षात निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत युती आणि आघाडीचे मित्र पक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटणार आहेत.

माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्व-ाखाली निवडणूक लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची परिस्थिती गेल्यावेळी पेक्षा सुधारलेली दिसून येते. सक्षम उमेदवार निवडीत आघाडी घेतली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर विद्यमान आमदार संतोष दानवे यांनी यावेळी पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष घातले असल्याने शहरात भाजपची परिस्थिती गेल्या वेळेपक्षा आता सुधारेली दिसून येत आहे.

भाजपनेही पालिकेवर त्यांचा झेंडा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. तर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणारी काँग्रेस गेल्या वेळच्या निवडणुकीत सर्वात आघाडीवर होती. सर्वच पक्षांनी आपापल्या पध्दतीने उमेदवार उभे करण्याचा चंग बांधल्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. मुख्य सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, भारतीय जनता पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांतच होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

दरम्यान, आमदार संतोष दानवे यांनी भोकरदनकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. तालुक्यातील सेलूद धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेकडे ते जातीने लक्ष देत आहे. यामुळे भाजपाला हा मुद्दा सकारात्मक चित्र निर्माण करून देणारा ठरणार आहे.

योग्य उमेदवारांसाठी नेत्यांची धावाधाव

या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा, आम आदमी पार्टी व इतरांनीही आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मात्र त्यांनाही पूर्ण प्रभागात योग्य उमेदवार मिळालेले नाही. भोकरदन पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवाराचे गणितं जुळवताना सर्वच पक्षांना योग्य उमेदवारीसाठी धावाधाव करावी लागत आहे.

असे होते पक्षीय बलाबल

भोकरदन नगरपालिकेमध्ये एक नगराध्यक्ष व वीस नगरसेवक यासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गेल्यावेळी भोकरदन पालिकेमध्ये एक नगराध्यक्ष व १७ नगरसेवक होते.

नगराध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या पत्नी मंजुषा राजाभाऊ देशमुख या होत्या. तर काँग्रेसचे नऊ, भाजपाचे चार व राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे दोन स्वीकृत सदस्य असे पक्षीय बलाबल होते.प्रमुख उमेदवार

प्रमुख उमेदवार

काँग्रेस : प्रियंका प्रतीक देशमुख, जाधव गयाबाई रमेश भाजप : माळी आशाताई एकनाथ, शर्मा प्रीती रोहित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : खान सोफिया बेगम शब्बीर, शहा रजियाबी अजहर आली, मिर्झा सम्रीन वेग वसीम बेग शिवसेना शिंदे गट : शर्मा उज्ज्वला भूषण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT