Digital Arrest : 'डिजिटल अरेस्ट' या सायबर गुन्हेगारीतील फसवणुकीपासून सतर्क रहा : योगेश चव्हाण  File Photo
जालना

Digital Arrest : 'डिजिटल अरेस्ट' या सायबर गुन्हेगारीतील फसवणुकीपासून सतर्क रहा : योगेश चव्हाण

व्यावसायिक, नागरिकांनी समजून घेतले सायबर सुरक्षेचे महत्त्व

पुढारी वृत्तसेवा

Be alert to cybercrime scam 'Digital Arrest': Yogesh Chavan

जालना, पुढारी वृत्तसेवा डिजिटल अरेस्ट नावाने सध्या एक नवीन प्रकारची सायबर फसवणूक सुरू आहे. सायबर गुन्हेगारीतील एक नवीन पण अतिशय धोकादायक असलेल्या या फसवणुकीला अनेकजण बळी पडतात. मात्र, अनेकजण तक्रारी करत नाहीत. अशा गुन्ह्यात न्याय आणि लुबाडलेली रक्कम परत मिळून देण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित आहे. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी केले.

सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या सायबर फसवणुकीच्या प्रकारामुळे नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकाराविषयी जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण आणि पोलिस अंमलदार संदीप मांटे यांनी व्यापारी, उद्य ोजक आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा वर्षा पित्ती, सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत यांची उपस्थिती होती. योगेश चव्हाण म्हणाले की, डिजिटल अरेस्ट प्रकारात सायबर गुन्हेगार स्वतःला केंद्रीय तपास संस्था, पोलिस अधिकारी, बँकेचे तसेच अन्य अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना व्हिडीओ कॉल, ई-मेल किंवा फोनद्वारे धमकावतात. तुमचा मनी लॉन्डरिंग, ड्रग्स प्रकरणात सहभाग आहे, तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यासाठी तुमचे अरेस्ट ऑर्डर निघाले आहे, अशा प्रकारचे आरोप लावून त्यांच्याकडून बँक तपशील, ओटीपी किंवा ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. काही प्रकारात तुमचं बँक खातं गोठवलं जाणार आहे.

अटक वॉरंट निघालंय असं सांगतात. तुम्हाला सतत व्हिडीओ कॉलवर राहण्यास भाग पाडून मानसिक दबाव आणतात आणि भीतीच्या वातावरणात नागरिक पैसे ट्रान्सफर करतात. डिजिटल अरेस्ट हा एक बनावट प्रकार असून, पोलिस किंवा सरकारी संस्था कधीही अशा पद्धतीने अटक करत नाहीत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स, ईमेल्स, व्हॉट्सअॅप मेसेजेस अथवा सोशल मीडियावरून आलेल्या लिंक्सवर कधीही विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक देवाण घेवाण करण्यापूर्वी त्या व्यक्तीची खात्री करणे अत्यावश्यक आहे. सोशल मीडियावरील व्यवहार करताना 'टू स्टेप व्हेरिफिकेशन' सुरू ठेवावे, जेणेकरून तुमचे अकाउंट सुरक्षित राहील. अनेकदा ऑनलाइन व्यवहार करताना रजिस्टर नसलेल्या अॅप्सवर गुंतवणूक केली जाते.

खात्री करा

कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण करण्यापूर्वी त्या व्यक्तीची खात्री करणे अत्यावश्यक आहे. सोशल मीडियावरील व्यवहार करताना 'टू स्टेप व्हेरिफिकेशन' सुरू ठेवावे, जेणेकरून तुमचे अकाउंट सुरक्षित राहील. अनेक वेळा लोक ऑनलाइन व्यवहार करताना रजिस्टर नसलेल्या अॅप्सवर गुंतवणूक करतात, जी पुढे फसवणुकीचे साधन ठरते. क्रिप्टो अथवा इतर फायनान्शियल व्यवहार अधिकृत व सुरक्षित प्लॅटफॉर्मवरून करावे असे चव्हाण म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT