Jewelry Stolen : बदनापूरच्या महिलेचे मंठ्यात दागिने लंपास Pudhari File Photo
जालना

Jewelry Stolen : बदनापूरच्या महिलेचे मंठ्यात दागिने लंपास

पाकीटमाराने बसमध्ये चढताना मारला डल्ला

पुढारी वृत्तसेवा

Badnapur Woman's Jewelry Stolen in Mantha

जालना, पुढारी वृत्तसेवा एसटी बसमधील प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात महिला अथवा पुरुष चोरांनी बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्सचे बटन काढून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना मंठा बसस्टँडवर घडली आहे. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सालिया शोयब शेख (२२, रा. बदनापूर) या महिला आपल्या माहेरी मंठा येथे आल्या होत्या. १५ मे रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्या सासरी परत जाण्यासाठी मंठा बसस्थानकावरून पुणे गाडीत (क्र. एमएच २० बीएल ३७७१) चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती.

याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे कानातले आयरींग (३ ग्रॅम) आणि पायातील चांदीचे चैनजोड अत्यंत चाणाक्षपणे लंपास केले. गाडीत बसल्यानंतर पर्स उघडी असल्याचे लक्षात येताच सालिया शेख यांना चोरी झाल्याचे समजले.

त्यांनी पोलिस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरुन मंठा पोलिसांनी याप्रकरणी बी.एन.एस. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरीचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT