Hingoli Crime : चोरट्याकडून बसमधील महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लंपास

चोरट्याविरुद्ध बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Hingoli Crime
चोरट्याकडून बसमधील महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लंपासpudhari photo
Published on
Updated on

आखाडा बाळापूर ः वारंगा फाटा-उमरखेड मार्गावरील बसमध्ये प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा विठ्ठल माखणे (वय 56, रा. शेवाळा) या 13 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता वारंगा फाटा येथून उमरखेडकडे जाणाऱ्या बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने त्यांनी आपली बॅग सीटवर ठेवण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे दिली. यानंतर बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.

Hingoli Crime
Hingoli Bus Theft | बसमध्ये चोरट्यांचा हातसाफ; महिलेचे ७० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

चोरट्याने मंगळसूत्रातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी किंमत 35 हजार रुपये तसेच कानातील दोन सोन्याचे झुंबर किंमत 35 हजार रुपये असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळापूर पोलीस तपास करीत आहेत.

Hingoli Crime
Jewelry robbery Case | दुकान बंद करत असताना सराफाचे 20 तोळे सोने, दीड लाख रु. लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news