Bribe Case : अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याला लाच घेताना पकडले File Photo
जालना

Bribe Case : अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याला लाच घेताना पकडले

शासकीय स्टॅम्प पेपर विक्री करताना अधिक पैसे मागितल्याप्रकरणी अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

पुढारी वृत्तसेवा

Authorized Stamp Vendor Caught Accepting a Bribe

जालना, पुढारी वृत्तसेवा : शासकीय स्टॅम्प पेपर विक्री करताना अधिक पैसे मागितल्याप्रकरणी अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवार, दि. १६ रोजी समोर आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत मोहनराव बनसोड (वय ७०) हे अधिकृत स्टॅम्प विक्रेते असून त्यांचे दुकान गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. तक्रारदाराला शैक्षणिक कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती. त्यासाठी तक्रारदाराने आरोपीकडून स्टॅम्प पेपर खरेदी केले होते.

तक्रारदाराला आणखी १० स्टॅम्प पेपरची गरज असल्याने त्यांनी पुन्हा आरोपीकडे संपर्क साधला. तक्रारदाराला १० स्टॅम पेपरचे एकूण ५५०० ची मागणी करण्यात आली. स्टॅम्प पेपरच्या अधिकृत किमतीपेक्षा ५०० रुपये जास्त रकमेची मागणी करण्यात आल्याचे तक्रारदाराने सांगितले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाने सापळा रचला. त्यानुसार आरोपी श्रीकांत बनसोड यांनी तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

या कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेण्यात आली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे, तसेच पंच आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT