महिलांचे आर्थिक स्वावलंबन; नऊ बचतगटांना प्रत्येकी चार लाखांचे वाटप

महानगरपालिकेचा पुढाकार; राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून बीज भांडवल
jalna news
महिलांचे आर्थिक स्वावलंबन; नऊ बचतगटांना प्रत्येकी चार लाखांचे वाटपfile photo
Published on
Updated on

Women's Economic Self-Reliance: Distribution of ₹4 Lakhs Each to Nine Self-Help Groups

जालना, पुढारी वृत्तसेवा :

महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांना स्वावलंबी करण्यासाठी महत्त्व-पूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत आणि दीनदयाळ अंत्योदय योजने-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून बीज भांडवल निधीचे धनादेश महिला बचत गटांना वितरित करण्यात आले. या अंतर्गत जालना अन्न प्रक्रिया व्यवसायात सक्रिय असलेल्या शहरातील ९ महिला बचत गटांना प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण ३६ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

jalna news
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील ११० महिलांचा सन्मान

मंगळवार, दि. १८ रोजी जालना, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात महिला बचत गटांसाठी बीज भांडवल निधीच्या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते महिला बचत गटांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी एकूण ९ महिला बचत गटांना प्रत्येकी ४ लाख रुपये प्रमाणे एकूण ३६ लाख रुपयांचा बीज भांडवल निधी देण्यात आला.

jalna news
Widows survey : सर्वेक्षण झाले; पण आधार अजून दूरच!

दामिनी शहर स्तर संघाच्या माध्यमातून जालना महानगरपालिकेच्या वतीने हा निधी वितरित करण्यात आला. या निधीमुळे महिला बचत गटांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

या योजनेचा लाभ मिळालेल्या बचत गटांमध्ये राजमाता जिजाऊ महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट, प्रयास महिला बचत गट, सानवी महिला बचत गट, लाडली महिला बचत गट, प्रतिबिंब महिला बचत गट, सुवर्ण ग्रुप महिला बचत गट, कृतिका महिला बचत गट आणि संयोग महिला बचत गट यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर, महिला बालकल्याण सभापती संध्या देठे, उपसभापती पद्मा मानधना, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, प्रमिला मोरे, यांच्यासह इतर अधिकारी व महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती.

महिला बचत गटांना आर्थिक बळ देऊन त्यांना उद्योग क्षेत्रात पुढे आणण्यासाठी अशा योजनांचा मोठा फायदा होणार आहे. बचतगटातील महिलांनी स्वयंरोजगार उभारून आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल करावी.
-वंदना मगरे, महापौर, मनपा जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news