जालना : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना, परतूर, परभणी, नांदेडसह नांदेड विभागातील हजारो वारकरी व भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने २४ व २५ जुलै रोजी नगरसूल–पंढरपूर, पंढरपूर–जालना, आदिलाबाद–पंढरपूर – मिरज, मिरज – पंढरपूर – आदिलाबाद तसेच अकोला–पंढरपूर आणि पंढरपूर–अकोला अशा एकूण सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.
यामध्ये गाडी क्रमांक ०७६३१ नगरसूल–पंढरपूर विशेष ही २४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता नगरसुल येथून सुटून रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन आणि कुर्डुवाडी मार्गे २५ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक ०७६३२ पंढरपूर–जालना विशेष ही २५ जुलै रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून सुटून कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू व परतूर मार्गे २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता जालना येथे येणार आहे.
विशेष गाड्यांचा थोडक्यात तपशील
०७६३१ – नगरसूल–पंढरपूर (२४ जुलै)
०७६३२ – पंढरपूर–जालना (२५ जुलै)
०७६३३ – आदिलाबाद–पंढरपूर–मिरज (२४ जुलै)
०७६३४ – मिरज–पंढरपूर–आदिलाबाद (२५ जुलै)
०७६३५ – अकोला–पंढरपूर (२४ जुलै)
०७६३६ – पंढरपूर–अकोला (२५ जुलै)