Jalna Yelahanka Special Train : जालना-येलहंका विशेष रेल्वेगाडीला हिरवा कंदील

बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा; जालन्यातून विशेष रेल्वेगाडी सुरू
Jalna Yelahanka Special Train : जालना-येलहंका विशेष रेल्वेगाडीला हिरवा कंदील
Published on
Updated on

जालना : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना–येलहंका–जालना दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०७६०१/०७६०२ या विशेष रेल्वेच्या माध्यमातून जालना व बंगळुरू परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०७६०१ जालना–येलहंका विशेष रेल्वे प्रत्येक रविवारी सायंकाळी ७.२० वाजता जालना येथून सुटणार असून ५, १२, १९ आणि २६ जुलै रोजी ती धावणार आहे. ही गाडी पुढील दिवशी रात्री ९.३० वाजता येलहंका येथे पोहोचेल.

Jalna Yelahanka Special Train : जालना-येलहंका विशेष रेल्वेगाडीला हिरवा कंदील
Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले !

तर गाडी क्रमांक ०७६०२ येलहंका–जालना विशेष रेल्वे प्रत्येक सोमवारी रात्री ११.३० वाजता येलहंका येथून सुटेल. ६, १३, २० आणि २७ जुलै रोजी ही गाडी धावणार असून बुधवारी पहाटे १ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.

विशेष रेल्वेगाडीत एकूण २४ आयसीएफ डबे असतील. यामध्ये ४ वातानुकूलित, १४ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे. या गाडीसाठी आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Jalna Yelahanka Special Train : जालना-येलहंका विशेष रेल्वेगाडीला हिरवा कंदील
Konkan Railway : उन्हाळी विशेष गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

असे असणार थांबे

या विशेष रेल्वेला परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, बोलाराम, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, तांडूर, यादगीर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनी, गुंतकल, गूटी, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदुपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news