‘आरटीई’तून प्रवेशासाठी ‘शुल्कवसुली’ pudhari photo
जालना

RTE : आरटीई' प्रवेशासाठी अर्जास मुदतवाढ

१८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार

पुढारी वृत्तसेवा

Application deadline for 'RTE' admission extended

जालना, पुढारी वृत्तसेवा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय (प्राथमिक) यांनी परिपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यानुसार सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांना १८ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया: https://stu-dent.maharashtra.gov.in/adm_ portal या संकेतस्थळावर सुरू आहे.

यापूर्वी अर्ज करण्याची मुदत १० मार्चपर्यंत होती. मात्र काही पालकांकडून अर्ज भरणे बाकी राहिल्यामुळे शासनाने अर्जाची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या निर्देशानुसार सर्व संबंधित अधिकारी, शाळा प्रशासन तसेच पालकांनी या प्रक्रियेची माहिती घेऊन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत भरावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असून या योजनेमुळे दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT