Crime News : शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

पैठण : एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Molestation Case |
Crime News : शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग File Photo
Published on
Updated on

Paithan Teacher molested student

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित विद्यार्थिनीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर शिक्षक संभाजी शिंदे याच्याविरुध्द बुधवारी (दि.११) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Molestation Case |
Sambhajinagar News : कुंजखेडा शिवारात वाळूमाफियांना चाप

ढाकेफळ येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली होती. घटना घडल्यापासून विद्यार्थिनी घरामध्ये कोणाला काही एक बोलत नव्हती. मुलगी नेहमी घाबरलेली दिसत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने विचारणा केल्यावर तिने याबाबत आईला सांगितले.

शिक्षक संभाजी शिंदे याने एकेदिवशी आईस्क्रीमचे आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. या घटनेबद्दल कोणाला सांगू नको, असे म्हणत आईस्क्रीम व गिफ्ट देण्याचे आमिष दाखवले, असे मुलीने सांगितले.

Molestation Case |
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बोकड, बकरी ठार

तक्रार या प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांच्याकडे दाखल केली. या शिक्षकाविरुद्ध बुधवारी (दि.११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविता जगताप करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news