वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारात उसाला आग लागल्याने २५ एकरवरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकर्यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही.
अंतरवाली सराटीमध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात जास्त आहे. तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी काकासाहेब तारख, संदीप अदलिंगे, प्रल्हाद तारख, सुरेश वाघ, उद्धव वाघ, एकनाथ रंधे, नरेंद्र गाढवे इत्यादी शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे.
आगीचे कारण अद्यापही समजले नाही. आग विझविण्यासाठी समर्थ साखर कारखान्याचे अग्निशमन व अंबड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.