जालना : जिल्हा वाहतूक शाखा आणि अंबड पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. pudhari photo
जालना

Ambad traffic drive : अंबडमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्या ६६ वाहनांवर कारवाई

नो पार्किंग, विना हेल्मेट, विना परवाना

पुढारी वृत्तसेवा

जालना : अंबड शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अपघातांना आळा बसावा, या उद्देशाने आज जिल्हा वाहतूक शाखा व अंबड पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान नो पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली वाहने, विना हेल्मेट दुचाकी चालविणारे, वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसलेले तसेच रॉंग साईडने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. या संयुक्त मोहिमेत एकूण 66 वाहनांवर कारवाई करून संबंधित वाहनचालकांकडून नियमानुसार दंड आकारण्यात आला.

ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर बगाटे, गजानन जारवाल तसेच अंबड पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल केंद्रे, ठोंबरे आणि चालक गोरख राठोड यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, वैध वाहन परवाना बाळगावा, रॉंग साईडने वाहन चालवू नये व नो पार्किंगमध्ये वाहने उभी करू नयेत, असे आवाहन अंबड पोलिस प्रशासनासह जिल्हा वाहतुक शाखेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT