Jalna Crime News : अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी जेरबंद Crime File Photo
जालना

Jalna Crime News : अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी जेरबंद

चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Accused who abducted minor girl apprehended.

जालना, पुढारी वृत्तसेवा : चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील ३९ वर्षीय महिलेने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. तिच्या अल्पवयीन मुलीला दीपक राजू जाधव (रा. माळशेंद्रा, ता. जि. जालना) याने फूस लावून पळवून नेल्याचे तीने तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास चंदनझिरा पोलिस ठाणे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून सुरू होता. मात्र पीडित मुलगी व आरोपीचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी २१ मे रोजी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी व पीडितेचा शोध घेतला.

तपासादरम्यान आरोपी आणि पीडिता हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील राजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माऊलीनगर, कमळापूर, रांजणगाव येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. पीडित मुलीची ओळख पटवून आरोपीसह त्यांना पुढील कारवाईसाठी जालना येथे आणून चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT