Jalna News : मका गेली, सोयाबीन गेले आता मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष file photo
जालना

Jalna News : मका गेली, सोयाबीन गेले आता मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पिंपळगाव रेणुकाई परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

A large amount of kharif crops have been damaged in Pimpalgaon Renukai area

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात पावसाने मोठा खंड दिल्याने मका, सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद व तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागले आहे.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी गाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी समाधान सोनुने आणि सहायक कृषी अधिकारी नंदकिशोर पायघन यांचे पथक शेतात दाखल झाले.

यावेळी शेतकरी पंडित नरवाडे, संतोष बोर्डे, गजानन नरवाडे, कृष्णा बेराड, अकील शेख व शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पथकाने पाहणी केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, यंदा मक्याची पेरणी वेळेत झाली होती. पीक कणीस अवस्थेत असताना पावसाने अचानक पाठ फिरवली.

पाणी न मिळाल्याने कणसातील दाणे भरलेच नाहीत. कणसे पोकळ राहिली असून झाडे जागेवरच वाळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी वैरण म्हणूनही या पिकाचा उपयोग होत नाही. खरीप हंगामातील मकासह इतर पिकांवर मोठा खर्च झाल्याने हा खर्च निघणार कसा असा सवाल शेतकरी कृष्णा बेराड यांनी पथकाला केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT