Garlic Price : लसणाचा 'थाट'! प्रतिक्विंटल १४,५०० रुपयांचा उच्चांकी दर

बाजारात डाळिंब व अद्रकलाही चांगला भाव, फळबाजारात डाळिंब अन् सफरचंद आघाडीवर
Garlic Price
Garlic Price : लसणाचा 'थाट'! प्रतिक्विंटल १४,५०० रुपयांचा उच्चांकी दरfile photo
Published on: 
Updated on: 

Garlic hits a record high price of ₹14,500 per quintal

जालना, पुढारी वृत्तसेवाः कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना (तसेच उप बाजार पेठ रामनगर, नेर व सेवली) येथे बुधवार, दि.३० रोजी भाजीपाला आणि फळबाजारात मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवण्यात आली. बाजारपेठेत विविध शेतमालाला चांगला उठाव मिळाला असून, विशेषतः लसूण, अद्रक, डाळिंब आणि शेवग्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. बाजारात लसणाला तब्बल १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला.

Garlic Price
Jalna Mahavitaran : खासगी व्यक्तींकडून वीज दुरुस्‍तीचे कामे, महावितरणकडून बडतर्फीची कारवाई होणार

बाजार समितीत लसणाची ८.२ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान ३,००० रु., सरासरी ९,००० रु. तर कमाल १४,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अद्रकाची ४.२ क्विंटल आवक होऊन कमाल भाव ९,००० रु. (सरासरी ३,८०० रु.) नोंदवला गेला. तसेच लिंबाची १.१ क्विंटल आवक होऊन त्यास कमाल ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

फळ विभागात एकूण ३ लाख ५६ हजार ६०३ रुपयांची उलाढाल झाली. यात ६८ कॅरेट आवक झालेल्या डाळिंबाला कमाल ३,००० रुपये (सरासरी २,२०० रु.) प्रति कॅरेट भाव मिळाला. ५९ कॅरेट आवक झालेल्या सफरचंदाला कमाल २,६०० रुपये (सरासरी १,८०० रु.), तर ३३ कॅरेट आवक झालेल्या ड्रॅगन फ्रूटला कमाल २,००० रुपये दर मिळाला. संत्र्याची १४ कॅरेट आवक होऊन कमाल १,८०० रुपयांचा दर मिळाला.

Garlic Price
Jalna Drought News : शेतीनंतर आता पशुधन संकटात; चिंता वाढली!

भाजीपाला विभागात एकूण ५ लाख ८६ हजार ३९२ रुपयांचे मूल्यांकन झाले. यात कांदा ३७.६ क्विंटल आवक (कमाल ४,६०० रु. सरासरी २,८०० रु.) हिरवी मिरची व शेवगा कमाल ६,००० रु. प्रतिक्विंटल दोडके व भुईमूग शेंगाः कमाल ५,००० ते ५, २०० रु. प्रतिक्विंटल आलु (बटाटा): ५८.६ क्विंटल आवक (कमाल १,२०० रु. सरासरी ८०० रु.) पालेभाज्या: कोथिंबिरीची १,६५० जुडी आवक होऊन कमाल ५५० रु. तर मेथीची १,३५० जुडी आवक होऊन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news