Jalna Drought News : शेतीनंतर आता पशुधन संकटात; चिंता वाढली!

चारा टंचाईचा प्रश्न ऐरणीवर; चारा-पाण्याच्या व्यवस्थेची मागणी
Jalna Drought News
Jalna Drought News : शेतीनंतर आता पशुधन संकटात; चिंता वाढली!file photo
Published on: 
Updated on: 

After agriculture, livestock is now in crisis; concerns mount

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकऱ्यांसमोर आता पशुधनाच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. उपलब्ध हिरवा चारा दोन महिन्यांतच संपणार असल्याने जनावरांसाठी चाऱ्याची टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शासनाने चारा छावण्या उपलब्ध कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.

Jalna Drought News
Jalna crime : आष्टी परिसरात अवैध वृक्षतोडीवर कारवाई

जिल्ह्यात सुमारे ८ लाख ३० हजार जनावरे असून, आगामी काळात त्यांना चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यंदा खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. यामुळे पिकांचा भुगा झाला आहे. याची दखल घेत शासनाने जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या संदर्भात राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना जाहीर केल्या असल्या, तरी अनेक भागांत अद्याप पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध नसल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.

काही भागांत गवत अपेक्षित प्रमाणात वाढले नाही, तर मका व इतर चारा जालना जिल्ह्यात तालुकानिहाय पशुधन पिकांचे उत्पादनही घटले आहे. त्यामुळे आगामी काळात चाऱ्याची टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने अनेक शेतकरी जनावरे बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चित्र दिसत आहे. बैल, दूध देणारी जनावरे तसेच अन्य पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करून पशुधनाचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Jalna Drought News
Jalna Drought | सोयाबीनला शेंगा, मक्याच्या कणसात दाणे नाहीत, कपाशीही शेतातच कोमेजली; दुष्काळाची दाहकता दिसू लागली

जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीस बंदी

जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत 'ट्रिगर-१' (प्रथम टप्पा) दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचा सुका अथवा ओला चारा वाहतूक करून नेण्यास तसेच विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश काढला आहे. हा आदेश ३० सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे. चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय आहे.

logo
Pudhari News
pudhari.news