Jalna Crime News : गुप्तधनाच्या बहाण्याने मांत्रिकांची टोळी शेतात file photo
जालना

Jalna Crime News : गुप्तधनाच्या बहाण्याने मांत्रिकांची टोळी शेतात

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, परतूर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

A gang of sorcerers entered the fields under the pretext of hidden wealth

परतूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचे सांगून गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकांची टोळी शेतात दाखल झाल्याचा प्रकार मंठा तालुक्यातील माहोरा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सेवली पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याच्या शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय होता. हे गुप्तधन मंत्र-तंत्र आणि पूजा करून काढून देतो, असे घाडगे बाबा नावाच्या व्यक्तीने शेतकऱ्यास सांगितले होते.

यासाठी अहिल्यानगर येथील एक मोठा मांत्रिक असून त्याची टीम असल्याचेही सांगण्यात आले. गुप्तधन काढल्यानंतर त्याची आपसात वाटणी करण्याचे ठरल्याची माहिती पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास संबंधित व्यक्तींची टीम सदर शेतकऱ्याच्या शेतात आली होती. दरम्यान, टकले पोखरी परिसरात काही अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावातील नागरिकांनी या व्यक्तींना वाहनासह अडवून ठेवले होते.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची चौकशी केली अ सुरुवातीला त्यांनी नावे सांगण टाळाटाळ केली. मात्र, सन चौकशीत गुप्तधन काढण्यासाठी इसम आल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित वाह झडती घेतली असता खोद करण्याचे साहित्य, काठ्या, घ हातोडा, लिंबू, कुंकू, बदाम, सु आदी पूजा साहित्य आढळून संशयीत टोळीने कोणाला ओळख नये यासाठी वाहनाच्या नंबर प्ले चिखल लावलेला असल्याने पोलि-संशय अधिक बळावला होता. त्या कारवाई करण्यात आली.

गुन्हा दाखल

या प्रकरणात नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सेवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT