

Deputy Chief Minister Shinde's assurance of in-principle approval of water supply scheme; come Success in pursuit of Khotkars
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या आग्रही पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून प्रस्तावित १,२४६ कोटी रुपयांच्या स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वतः मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे.
नुकत्याच मौजपुरी (ता. जालना) येथील दौऱ्यादरम्यान आ. खोतकर यांनी हा गंभीर प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्याची तत्काळ दखल घेत शिंदे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आ. खोतकर यांनी पत्र देऊन उपमुख्यमंत्री शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक बोलविण्याची मागणी केली आहे.
सन २०६० पर्यंत शहराची अंदाजित ७.७३ लाख लोकसंख्या गृहीत धरून या योजनेत स्वतंत्र मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण प्रकल्प, टाक्या आणि आधुनिक पंपिंग यंत्रणेचा समावेश असेल. या पाणीपुरवठा योजनेमुळे जालनेकरांची पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.