Jalna Agriculture News : फुलकोबीला मिळतोय कवडीमोल भाव

पिंपळगाव रेणुकाई शिवारातील शेतकरी हतबल; शेतकरी दिवाळीतच आर्थिक संकटात
Jalna Agriculture News
Jalna Agriculture News : फुलकोबीला मिळतोय कवडीमोल भावfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna Cauliflower is getting a cheap price

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारात फुलकोबीला कवडीमोल भाव मिळाला आहे. लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. खरीप, रब्बी हंगामासह भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

Jalna Agriculture News
Jalna Drought : जिल्ह्यातील फळबागांना दुष्काळाची झळ

या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड करतात. यंदादेखील अनेक शेतकऱ्यांनी फुलकोबीचे पीक मोठ्या आशेने घेतले होते. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर फुलकोबीला केवळ ४ ते ५ रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवर "दुष्काळात तेरावा महिना" अशी परिस्थिती ओढवली आहे मिळालेल्या माहितीनुसार, दोन एकर फुलकोबी लागवडीसाठी बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि पाणी यासाठी जवळपास एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सध्या बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर प्रचंड घसरले आहेत. शेतकऱ्याच्या हाती ५० हजार रुपयांचे उत्पादन देखील लागत नसल्याने शेतकऱ्यांना थेट ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पिंपळगाव रेणुकाई सह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाने दडी दिल्याने विहिरीच्या पाण्यावर कसेबसे पीक जगवले. त्यासाठी डिझेल, विजेचा मोठा खर्च केला. पीकही जोमदार आले. पण भावच नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Jalna Agriculture News
Jalna News : पाडव्याच्या मुहूर्तावर डाव्या कालव्यात पाणी; हरभरा-ज्वारीचे क्षेत्र वाढणार

आम्ही पहाटे तीन वाजता उठून गाडी भरून बाजारात माल आणतो, पण व्यापारी ४ रुपये किलोने मागतात. यातून गाडी भाडे देखील निघत नाही. दिवाळीच्या सणाला मुलांना कपडे कसे घ्यायचे, असा प्रश्न पडला आहे ऐन सणासुदीच्या काळातच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने शासनाने तात्काळ हमीभाव किंवा अनुदान द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

दोन एकर फुलकोबी लागवड केली होती. त्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च झाले. परतु बाजार भाव कोसळला आहे. त्यामुळे पन्नास रुपये रुपये झाले. यामुळे मोठा आर्थिक झळ बसली आहे.
- नीलेश देशमुख, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.