शिवजन्मोत्सवानिमित्त जालनाकरांसाठी वैचारिक मेजवानी file photo
जालना

शिवजन्मोत्सवानिमित्त जालनाकरांसाठी वैचारिक मेजवानी

गाढे यांचे व्याख्यान तर खोमने यांचा शिवगीतांचा कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

A feast of intellectual discourse for the people of Jalna on the occasion of Shivaji maharaj Jayanti

जालना, पुढारी वृत्तसेवा :

शिवजयंती निमित्ताने जालना शहर शिवजन्मोत्सव समितीतर्फे दि.१७फेब्रुवारी रोजी प्रख्यात विचारवंत बालाजी गाढे यांचे व्याख्यान व प्रसिद्ध गायक रवींद्र खोमने यांच्या शिवगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश कदम यांनी रविवार (दि. ८) रोजी येथे दिली.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष पंकज बागल, सचिव अॅड. राम कुऱ्हाडे, शेख इब्राहिम, कार्याध्यक्ष आतिकखान, कोषाध्यक्ष चैतन्य जायभाये आदींची उपस्थिती होती. योगेश कदम पुढे म्हणाले की, सायंकाळी ६ वाजता अंबड चौफुलीवर सुप्रसिद्ध व्याख्याते बालाजी गाढे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

यानंतर प्रसिद्ध गायक रवींद्र खोमने यांच्या शिवगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास शिवशंभू चरित्रकार हभप गजाननदादा शास्त्री यांचे शुभाशिर्वाद लाभणार आहेत. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल आदींची उपस्थिती असणार आहे.

रक्तदान शिबीराचे आयोजन

दि. १८ फेब्रुवारी रोजी शेख इब्राहिम मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ५०० तरूण रक्तदान करणार आहेत. जालना शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT