

Experience the joy of real income from Anandnagari
जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड जूनिअर कॉलेजमध्ये आनंद नगरी तसेच कला-हस्तकला प्रदर्शिनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी खऱ्या कमाईचा आनंद अनुभवला आहे.
या आनंद नगरीचे उद्घाटन भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रेवती मांटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. सुगदेव मांटे, प्राचार्या लतिका मनोज, वरुण अंबेकर, गायत्री माटे, मिताली माटे, अपर्णा भंडारे, डॉ. वर्षा शेळके यांची उपस्थित होती.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेले विविध पदार्थ टेबलवर मांडून त्यांची विक्री केली. तसेच शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्या चविष्ट पदार्थाची खरेदी करून मन मुराद आनंद लुटला. भारतातील विविध प्रांतातील प्रसिद्ध पदार्थांची चव चाखण्याची संधी यावेळी उपस्थितांना मिळाली. आढळून आली. विद्यार्थ्यांनी स्वतः च्या हातांनी बनवलेल्या कलाकुसरीचे कला-हस्तकला प्रदर्शन भरविले होते.