Police Patil Recruitment 7843 students appeared for the exam in 24 centers
जालना, पुढारी वृत्तसेवा : पोलीस पाटील भरती २०२५ करीता जालना शहरातील २४ परिक्षा केंद्रात रविवारी झालेल्या परिक्षेत ७ हजार ८४३ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. परिक्षा पारदर्शक होउन गैरप्रकार होउ नयेत यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी परिक्षा केंद्राना भेट देवून परीक्षेच्या तयारीचा आणि व्यवस्थेचा यावेळी आढावा घेतला.
जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गाची पदभरतीसाठी जिल्ह्यातील जालना उपविभाग १८५, भोकरदन उपविभाग २४२, अंबड उपविभाग २५१ आणि परतूर उपविभाग २०४ अशा ७२४ रिक्त पदासाठी रविवारी २४ परिक्षा केंद्रात लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. रविवारी झालेल्या पोलीस पाटील भरती परीक्षेस ७हजार ८४३ परिक्षार्थी बसले होते. जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी येथील अंकुशराव टोपे महाविद्यालय, डॉ. बद्रीनारायण बारवाले, महाविद्यालय या परिक्षा केंद्रास भेट देवून पाहणी केली.
पोलीस पाटील भरती २०२५ ही अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने यशस्वीरित्या पार पडावी याकरीता सर्व परिक्षा केंद्रावर बैठे पथक व भरारी पथक यांची नियुक्त करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेमध्ये सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कर्मचारी, पोलीस यंत्रणा व तांत्रिक पथक यांनी उत्कृष्ट समन्वय दाखवत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे सर्व परिक्षा केंद्रावर शांततापुर्ण वातावरणात परिक्षा पार पडली. अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
जालना जिल्ह्यात पोलिस पाटलांच्या ७२४ रिक्त पदांसाठी रविवारी २४ परिक्षा केंद्रावर परिक्षा झाल्यानंतर आता उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले असल्याचे परिक्षेनंतर दिसुन आले. अनेक जण निकालाबाबत आशावादी असल्याचे दिसुन आले.