

Ladki Bahin Yojana Problems like website downtime, OTP not coming, server down
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योजनेवा लाभ चालू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक असताना, वेबसाईट ठप्प होणे आणि ओटीपी न येणे यासारख्या तांत्रिक समस्यांमुळे महिलांची चिंता वाढली आहे.
योजनेचा उद्देश असा की लाभार्थीच्या सन्मान निधी वितरणात सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे लाभार्थीमध्ये नाराजी पसरली आहे.
तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अडचणींचा डोंगर योजन-'चा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता महिलांना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अशी येते आधार क्रमांकाची अडचण केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत. त्यांना केवायसीसाठी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तांत्रिक कारणांमुळे वेळ-`चा अपव्यय होत आहे. कमी मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मोठी धावपळ लाडच्या बहिणीना करावी लागत आहे. सरकारने या तांत्रिक त्रुटी त्वरित दर करून प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून केली.