Additional Teacher : राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर Pudhari File Photo
जालना

Jalna News : जाफ्राबाद तालुक्यात ३३ शिक्षक अतिरिक्त

पटसंख्या घटली, प्रवेशासाठी खासगी शाळांकडून आमिष

पुढारी वृत्तसेवा

33 teachers surplus in Jafrabad taluka

रावसाहेब अंभोरे :

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १४७ शाळा आहेत. मागील तीन वर्षांत या शाळांतील झपाट्याने पटसंख्या घटत आहे. तालुक्यात ५२० शिक्षक असून यापैकी ४८७ शिक्षक कार्यरत आहे. तर ३३ शिक्षक अतिरिक्त आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने पटसंख्येत घट होत असल्याने पटसंख्या वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या चिंताजनकरीत्या घटत असून, भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील खासगी शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाहिरातबाजी करून पालकांना आकर्षित करण्यात यश मिळवले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडेदेखील पालकांचा कल दिसून येतो. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असली तरी जिल्हा परिषदांच्या शाळांमधील घसरणारा पट शिक्षकांची डोकेदुखी ठरत आहे. हा पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जातात.

सक्तीने शिक्षण देण्यासाठी शाळाबाह्य मुलांचाही शोध घेऊन त्यांच्या वयोगटानुसार त्यांना वर्गात प्रवेश दिला जातो. असे असतानाही पटसंख्येत होणारी घसरण शिक्षकांसह प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनली आहे. तालुक्यातील १४७ शाळामधून पहिली ते आठवीवर्गात १३ हजार ८३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यानसाठी ५२० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून यातील ४८७ शिक्षक कार्यरत आहे. उर्वरित ३३ शिक्षक अतिरिक्त आहे. त्यांना समायोजनाची प्रतिक्षा आहे.

२० जून रोजी टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय समितीची महत्त्वाची बैठक झाली यावेळी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या घटल्याने याविषयावर चर्चा झाली. यावेळी प्रत्येक वर्गातील खोली मध्ये टीव्ही संच बसवून डिजिटल शिकवणी देण्यासाठी सर्वानी पुढाकार घेतला आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, गौतम चंदनशिवे, रावसाहेब अंभोरे, रेखा जमधडे, प्रणिती आव्हाळे, दशरथ खरात, कुरेशी मँडम, सतिष खरात, मंगलाताई माने आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना दिली जातात विविध आमिषे

तालुक्यातील इंग्रजी माध्यम व खासगी शाळेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना "शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, बससेवा अशी आमिषं दाखवून प्रवेशासाठी ओढलं जातंय. शिक्षण हक्क कायद्याचा उघड भंग होतोय. पण कुणाचं लक्ष नाही. पुर्वीच्या काळात विद्यार्थी असायचे तर बसायला खोल्या नव्हत्या तर शिकवणीसाठी शिक्षक नसायची आता मात्र उलटे झाले. वर्ग खोल्या आहेत. शिक्षकही आहेत. परंतु विद्यार्थीच नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT