MLA Abhimanyu Pawar : औसा तालुक्यात संचमान्यता आधार व्हॅलिडिटीऐवजी प्रत्यक्ष पटसंख्येवरच द्यावी

आमदार अभिमन्यू पवार यांची अधिवेशनात मागणी
Education governance issue Ausa
अभिमन्यू पवार pudhari photo
Published on
Updated on

औसा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्न सध्या चर्चा विषय ठरत असून शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत पटसंख्येऐवजी आधार व्हॅलिडिटी संख्येचा आधार घेतला जात असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अभिमन्यू पवार यांनी अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे मांडत शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पटसंख्या विचारात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

औसा तालुक्यात एकूण 179 जिल्हा परिषद शाळा असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 15,316 इतकी आहे. मात्र यापैकी 394 विद्याथ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही, तर 218 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड दुरुस्ती प्रक्रियेत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाही आधार व्हॅलिडिटीच्या आकडेवारीनुसार कमी संख्या ग्राह्य धरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Education governance issue Ausa
Gardabh Swari festival Kej : ब्रेकनंतर पुन्हा रंगणार गर्दभ स्वारी; जावयांच्या शोधात तरुणांची धावपळ

उपलब्ध माहितीनुसार, सुमारे 15,704 विद्यार्थ्यांची आधार नोंद असली तरी व्हॅलिडिटीच्या आधारे सुमारे 14,704 विद्यार्थ्यांवर संचमान्यता निश्चित केली जात आहे. परिणामी प्रत्यक्ष पटसंख्या 15,316 असतानाही कमी संख्येवर शिक्षकांचे समायोजन होण्याची शक्यता आहे. यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

औसा शिक्षक संघानी केली होती मागणी

औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सन 2025-26 च्या संचमान्यतेत आधार व्हॅलिड संख्येऐवजी प्रत्यक्ष पटसंख्या ग्राह्य धरण्याची मागणी पुढे आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व स्थानिक लोकप्रतिनिधींनी अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले होते. 394 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, तर 218 विद्यार्थ्यांचे आधार दुरुस्ती प्रक्रियेत आहेत.

23 ऑक्टोबर 2025 च्या आधार व्हॅलिड आकडेवारीनुसार 14,704 विद्यार्थ्यांवरच संचमान्यता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित 394 विद्यार्थी वगळले जाऊन शिक्षक पदे कमी झाली असल्याची तक्रार संघाने केली आहे. यावर आमदार पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी हा प्रश्न विधानसभेत चचेर्साठी आणलायामुळे औसा तालुक्यातील शिक्षक, पालक व शिक्षण क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून शिक्षण विभागाने याबाबत काय निर्णय घेतो, याकडे सवांचे लक्ष लागले आहे.

Education governance issue Ausa
Hurda party in Jamkhed : जामखेड शेतात रंगताहेत हुरडा पार्टी

काय आहेत संचमान्यतेचे शासन निकष

शिक्षण संचालक, पुणे यांच्या पत्रानुसार 2025-26 या शैक्षणिक वषार्साठी संचमान्यतेची अंतिम प्रक्रिया सुरू असून आधार व्हॅलिडिटीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र आमदार पवार यांनी 394 आधार नसलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून तसेच 218 दुरुस्तीतील प्रकरणे विचारात घेऊन संचमान्यता निश्चित करावी, अशी मागणी केली. आधार व्हॅलिडिटीवर नव्हे तर प्रत्यक्ष शाळा पाहणी व सत्य पटसंख्येच्या आधारेच शिक्षक समायोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. या मागणीमुळे औसा तालुक्यातील शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून शिक्षण विभाग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news