20 lakh fraud with the lure of a salary of 10,000 per month; Filed a case
जालना, पुढारी वृत्तसेवाः बांधकाम कामगारांना विविध २८ कल्याणकारी - योजनांचे आमिष दाखवून आणि दरमहा १० हजार रुपये पगाराचे आश्वासन देऊन -सुमारे २ हजार सभासदांकडून २० लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस - आला आहे. या प्रकरणी 'विश्वमंगल असंघटित कामगार संघटने'च्या तीन - भामट्यांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना रविकुमार इंगळे (वय ४०, रा. मोंढा, परतूर रोड, जालना) यांनी या - प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली - आहे. त्यांच्या तक्रारीवरून संतोष रामभाऊ इंगळे (रा. माळीपुरा, जालना), जिजाऊ उत्तम खुळे (रा. देवगाव हिवगाव, ता. घनसावंगी) आणि रवी मारोती प्रधान (रा. रेल्वे स्टेशनमागे, जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये आरोपींनी तक्रारदार वंदना इंगळे यांची भेट घेऊन 'विश्वमंगल असंघटित कामगार संघटना' (कार्यालयः श्रमशांती कार्यालय, संभाजीनगर/जालना) या संस्थेची माहिती दिली. साखळी पद्धतीने बांधकाम कामगार जोडल्यास दरमहा १०,००० रुपये पगार दिला जाईल, असे आमिष आरोर्पीनी दाखवले.
या विश्वासावर वंदना इंगळे यांनी सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या काळात राबवून सुमारे २ हजार नवीन सदस्य संघटनेत जोडले. प्रत्येक सदस्याकडून १ हजार रुपये याप्रमाणे गोळा झालेली २० लाख रुपयांची रक्कम त्यांनी संतोष इंगळे याच्याकडे रोख स्वरूपात जमा केली. आरोपींनी वंदना यांच्या नकळत त्यांच्या नावाने 'विश्वमंगल असंघटित कामगार महासंघ नावाचे बनावट ओळखपत्र छापून त्यावर त्यांना 'संस्थापक व अध्यक्ष' दर्शवले.
सतत दोन वर्षे काम करूनही ठरलेला पगार न मिळाल्याने आणि संस्था बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, वंदना इंगळे यांनी जमा केलेले २० लाख रुपये व स्वतःचा पगार परत मागितला. यावर ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिन्ही आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत शिवीगाळ केली.
तुझ्यासारख्या खूप पाहिल्यात....
"तुझ्यासारख्या खूप पाहिल्या, तुला काय करायचे ते कर," अशी धमकी देऊन आरोपींनी पैसे देण्यास साफ नकार दिला. या प्रकरणी रामभाऊ इंगळे जिजाऊ उत्तम खुळे, आणि रवी मारोती प्रधान या आरोपी विरोधात फसवणूक, धमकी देणे आदीसह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष नगरगोजे करीत आहे.