मराठवाडा

जालना : उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची आज आरोग्य तपासणी

backup backup

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत १७ दिवस आमरण उपोषणावर बसलेले मनोज जरंगे पाटील यांची आज आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी होणार असून त्याकरिता ते अंतरवाली सराटीतून शासकीय रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर मधील गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन तिथे त्यांच्या सर्व चाचण्या करून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

आमरण उपोषण केल्यानं डॉक्टरांनी त्यांना तपासण्या करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला ऐकत त्यांनी तपासणी करण्यासाठी होकार दिला. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंडळातील मंत्री यांच्या विनंती वरून त्यांनी तपासण्या करून उपचार घेण्यास सहमती दर्शवली. मराठा आरक्षणासाठी १७ दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची आज छत्रपती संभाजीनगर येथील गलॅक्सी हॉस्पिटल मध्ये विविध तपासण्या करण्यात येणार असून त्यासाठी मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगरकडे सुसज्ज रुग्णवाहिकेतून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत २५ वाहनाच्या ताफ्यातून शेकडो मराठा समाज बांधव ही रुग्णवाहिकेसोबत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT