मराठवाडा

बीड : बनावट कागदपत्रे तयार करून भरला पीक विमा; सीएससी सेंटर चालकाला अटक

अनुराधा कोरवी

बीड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मादळमोही येथील शेतीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्या आधारे सीएससी सेंटर चालकाने स्वतःच विमा भरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शेतकर्‍याच्या तक्रारीवरुन गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली.

अनिरुद्ध सोमेश्‍वर मुळे यांचे मादळमोही येथे गट नंबर ६४१ व ०८ मध्ये जमीन आहे. या जमिनीतील पिकाचा विमा भरण्यासाठी अनिरुद्ध मुळे हे सीएससी सेंटरवर गेले होते. परंतु, त्यांचा विमा स्वीकारला जात नव्हता. तशाही स्थितीत त्यांनी तो भरला. यानंतर विमा कंपनीने तो होल्डवर ठेवला होता. यानंतर मुळे यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली असता विमा कंपनीच्या अधिकार्‍यांनीही या क्षेत्रावरील जमिनीचा विमा कोणीही भरला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही मुळे यांनी पाठपुरावा सुरुच ठेवल्यानंतर त्यांना सदर जमिनीचा विमा टाकळगाव येथील सीएससी सेंटर चालक अण्णासाहेब गव्हाणे याने स्वतःच्या नावे भरल्याचे समजले.

यानंतर अनिरुद्धने आवश्यक ती कागदपत्रे घेवून गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार देताच गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळे, पोलिस जमादार गर्जे, देवडे यांनी अधिक तपास करुन गव्हाणे याला शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि साबळे हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT