Crime News pudhari photo
हिंगोली

Hingoli Crime : विहिरीच्या कामावरून दोन कुटुंबात तलवार, काठ्यांनी तुंबळ हाणामारी

चार जण गंभीर; चौघा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात विहिरीच्या कामावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

गारमाळ येथील युसुफ भिका नंदावाले यांचे पिंपळखुटा शिवारात शेत आहे. या शेतात विहिरीचे काम करण्यात आले आहे. मात्र मजुरांच्या कारणावरून युसुफ यांचा कासम नंदावाले याच्यासोबत वाद झाला. यावेळी कासम याने तू विहिरीच्या कामावरील मजुरांना आमच्या शेतातील विहिरीचे काम लवकर का करू दिले नाही या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दोघांमधील शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने दोन्ही कुटुंब समोरासमोर आले. यावेळी लोखंडी रॉड, काठ्या, तलावारीने हाणामारी झाली. या मारहाणीत युसुफ हे जखमी झाले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या युसुफ यांच्या पत्नी व मुले रफीक व फेरोज मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले.

तसेच विहिरीच्या कामावरील मजुरांना देण्यासाठी आणलेले ३० हजार रुपये इतरांनी काढून घेतले. या मारहाणीत जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी हिंगोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

  • या प्रकरणी युसुफ नंदावाले यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कासम नंदावाले, शकील नंदावाले, रज्जाक नंदावाले आणि आसिफ नंदावाले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT