लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार Pudhari File Photo
हिंगोली

Hingoli Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

तरुणावर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

वसमत : तालुक्यातील एका गावात विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोंढूर येथील एका तरुणावर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तरुणाच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.

कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील शिवाजी पतंगे (३०) या तरुणाची वसमत तालुक्यातील एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यावेळी पतंगे याने त्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून २५ फेब्रुवारी २०२५ रोजी तिच्यावर शेतात अत्याचार केला. त्यानंतर त्या विवाहितेस पुणे येथे फिरण्यासाठीही नेले. दरम्यान, आठवडाभरापूर्वी त्या महिलेस कोंदूर येथे त्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

यावेळी त्या विवाहितेने लग्न कधी करणार अशी विचारणा केली असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तसेच तिला शिवीगाळ केली. दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून वाद सुरू झाला. या वादातून पतंगे याने त्या विवाहितेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विवाहितेने थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

यावरून कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर घटना वसमत तालुक्यात घडल्यामुळे कळमनुरी पोलिसांनी सदर गुन्हा वसमत ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT