Beed Crime : डोळ्यात चटणी टाकून सोनाराला लुटणारी टोळी जेरबंद

एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kej taluka robbery case
डोळ्यात चटणी टाकून सोनाराला लुटणारी टोळी जेरबंदpudhari photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील युसुफ बडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनाराला डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २१ फेब्रुवारी रोजी एक सोनार मोटारसायकलवरून सोने विक्रीसाठी जुन्या डिघोळअंबा रोडने होळकडे जात असताना होळ ते डिघोळअंबा दरम्यान दर्याजवळ दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञातांनी त्याला अडविले. त्यानंतर आर-ोपींनी त्याच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली व हातातील सोन्याची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी सोन-ाराच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु.र. नं. ४६/२०२६ भा.न्या.सं. ३०९(६) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kej taluka robbery case
Ramdas Athawale : रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मांचा पक्ष

सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दि. २६ फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीदारामार्फत रोहित रंजीत धिमधिमे हा संशयित अंबाजोगाई बसस्थानक परिसरातील राज मेडिकल जवळ उभा असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सोनाराला लुटल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान सुदाम गणपत सोनवणे (रा. डिघोळअंबा, ता. धारूर), विरसिंग रिसपाल सिंग टाक (रा. अंबाज ोगाई), अभिषेक अशोक घाटुळ (रा. कन्हेवाडी, ता. परळी), कानिफनाथ विलास पुढील तपास सुरू आहे. डुरकर (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) व यशोदिप कल्याण किर्दन (रा. सातेफळ, ता. अंबाजोगाई) यांचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली. या धाडसी कारवाईमुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Kej taluka robbery case
Loknath Yashwant : विषमतावादी घटनेची नोंद म्हणजे साहित्य

असा लागला तपास

जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईन तपासणी केली. फुटेजमधील संशयितांची गुप्त माहिती संकलित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news