प्रातिनिधिक छायाचित्र   (File Photo)
हिंगोली

BOMB THREAT : टपाल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

यंत्रणा सतर्क : सायनाईड मिश्रित आरडीएक्स असल्याच्या ई-मेलने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Threat to blow up post office with bomb

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा टपाल कार्यालय, पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ई-मेल बुधवारी टपाल कार्यालयास प्राप्त झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्यालयातील कामकाज बंद करून तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. हिंगोलीतही पोलिसांनी पोस्ट ऑफिस कार्यालयात तपासणी केली. सदर ई-मेल कोणत्या भागातून आला याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

राज्यातील टपाल कार्यालयांना बुधवारी ई-मेल प्राप्त झाला. तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात दुपारी बारा वाजून १० मिनीटांनी सायनाईड विषारी वायू मिश्रीत १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे.

सर्वांना तातडीने बाहेर काढा, असे या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले. या ई-मेलमुळे राज्यातील बहुतांश टपाल कार्यालयातून एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच हिंगोलीत पोलिसांकडून पोस्ट ऑफिसमध्ये तपासणी करण्यात आली.

बॉम्ब शोध व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली. तसेच पार्सलचे बॉक्स तपासले. हिंगोली येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संजय मार्के यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पोस्ट ऑफिस परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली. सदर ई-मेल कोणत्या ठिकाणावरून आला याची चौकशी केली जात आहे. हिंगो-लीच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेचू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT