school scam Pudhari
हिंगोली

Hingoli school scam: हिंगोलीत मराठी शाळा दाखवून लाटले ५ कोटी? विधानसभेत गाजला मुद्दा, चौकशीचे आदेश

सेनगावच्या इंग्रजी शाळेची होणार चौकशी, मंत्री अतुल सावेंचे विधानसभेत आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या नामांकित इंग्रजी शाळेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची घोषणा इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यानुसार पुढील पंधरा दिवसांत या शाळेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.

सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मराठी शाळा असतांनाही कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून इंग्रजी शाळा दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या राजे यशवंतराव होळकर नामांकित शाळा योजनेचा लाभ घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दाखवून या शाळेने सुमारे ५ कोटी रुपये उचलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

या शिवाय मराठी शाळेची मान्यता एका ठिकाणी असतांना दुसरीकडे शाळा सुरु केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणी शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मंत्री अतुल सावे यांनी उत्तरामध्ये सदर शाळेच्या कागदपत्रांत खाडाखोड झाल्याचे दिसून आले आहे. या शाळेत पाहणी केल्यानंतर विद्यार्थी संख्या देखील कमी दाखविण्यात आली आहे. त्यानुसार इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या संचालकांना कारवाईबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.

या शिवाय आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील पंधरा दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मुटकुळे यांनी सांगितले. या प्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचा मुद्दाही त्यांनी स्पष्ट केला तर या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT