Hingoli News : बंदुकीचा धाक दाखवत ७ लाखांची लूट  File Photo
हिंगोली

Hingoli News : बंदुकीचा धाक दाखवत ७ लाखांची लूट

दरोडेखोरांच्या मारहाणीत एक जण गंभीर जरवमी

पुढारी वृत्तसेवा

Robbery of Rs 7 lakh at gunpoint at Hingoli

सेनगाव (जि. हिंगोली) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील घोरदरी येथे गावालगत असलेल्या एका शेतवस्तीवर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. घरातील एका जणास बेदम मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवित दरीचोखोरांनी ७ लाख रुपयांचा ऐवज सुटला. ही पटना शुक्रवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या एकास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात अाले.

सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथे माणिक साबळे यांचे १२ एकर शेत आहे. गावालगत असलेल्या शेतातच त्यांचे घर आहे. या विकाणी साबळे हे त्यांची फनी, मुले, सुना यांच्यासह राहतात, गुरुवारी माणिक यांनी शेतीमाल विक्रीचे साडेतीन लाख रुपये आणले होते. सदर रक्कम त्यांनी घरातील पेटीमध्ये ठेवली होती. बापेटीतच त्यांच्या कुटुंबातील महिलांचेही दागिने होते.

दरम्यान, गुरुवारी रात्री जेवण करून सर्व जग झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर काही वेळातच चोरटे पराजवळ आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर एकाने बंदूक काढली. तसेच इतरांनी चाकू कावले, आवाज केला तर एका एकाला खतम करून टाकेल, अशी धमकी दिली. मात्र माणिक यांचा मुलगा अशोक काने चोरट्यांसोबत झटापटीचा प्रयत्न केला. यामध्ये त्याच्या हाताला वाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी चोरट्यांनी सर्वांनाच धमकी देऊन शांत केल्यानंतर माणिक यांच्या जवळून पेटीची चावी घेतली.

त्यात ठेवलेले साडेतीन लाख रुपये रोख व महिलांचे दागिने असा सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. शुक्रवारी सकाळी माणिक यांनी सेनगाव पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, शिवसांब बेचारे, जमादार सुभाष चव्हाण, टी, के. वंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेच्या वेळीच नेमका वीज पुरवठा कसा खंडित झाला, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर श्वान पथकाला पाचारण केले. तसेच ठसे तज्हांनीही घटनास्थळी भेट दिली, श्वान पथकाला चोरट्यांचा मान काढता आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT