हिंगोली

हिंगोली: कळमनुरी मार्गावर दुचाकी अपघात : दोन जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर लासीना पाटीजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत दोघे जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१५) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींवर हिंगोली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथील सतीश भिमराव नलगे (वय २५) त्याचा मित्र सचिन कुरुडे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी कागदपत्रांच्या तपासणीसाठी हिंगोलीत आले होते. हिंगोलीतून कामे आटोपून ते दुपारच्या सुमारास परत गावाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांच्या दुचाकीला हिंगोली – कळमनुरी मार्गावरील लासीना पाटीजवळ एका वाहने धडक दिली.

या अपघात दुचाकीवरील सतिश याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रकाश बाबाराव उपनर (रा. हिंगोली) याचा मृत्यू झाला. या शिवाय या अपघातात सचिन कुरुडे व भगवान वाखरकर गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, नानाराव पोले, कर्मचारी कैलास गुंजकर, खंडेराव नरोटे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत सतीश व प्रकाश यांचे मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. तसेच अपघातात जखमी झालेल्या सचिन व भगवान यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT