Assault Pudhari
हिंगोली

Minor girl abuse case : अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा; बिस्कीटचे आमिष दाखवत अत्याचार, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Hingoli crime news: या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, अद्याप एकाचा शोध सुरू आहे

पुढारी वृत्तसेवा

हट्टा : तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी 4 आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते 4 च्या सुमारास हट्टा परिसरातील शेतशिवारात, तळ्याजवळ ही घटना घडली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेत बिस्कीट आणि 50 रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला मोटारसायकलवरून नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याशिवाय यातीलच एका आरोपीने सुमारे 15 दिवसांपूर्वी देखील बिस्कीटचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मुलींच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन

हा गुन्हा 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.18 वाजता हट्टा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. BNS चे कलम 137(2), 65(1), 70(2), 115(2) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4 व 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करत आहेत. पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी जागरूक राहावे. संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT