Minor Girl Abuse | भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवून कानात मंत्र फुंकला

पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
Minor Girl Abuse |
Minor Girl Abuse | भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवून कानात मंत्र फुंकला
Published on
Updated on

पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातून अंधश्रद्धेचा आणि विकृतीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवणाऱ्या स्वप्निल लांडे या भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा स्वयंघोषित गुरुवर्य सध्या फरार आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणारा आरोपी स्वप्निल लांडे हा अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करत असे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने हे संतापजनक कृत्य केले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या नराधमाने एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा बनाव केला. ‘‘तुला कसलीही अडचण किंवा संकट आले तर थेट माझ्याकडे ये,’’ असे खोटे आमिष दाखवत त्याने या निरागस चिमुकलीच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले.

पीडितेचे समुपदेशन; आरोपीचा शोध सुरू

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीला मानसिक धक्का बसला असून, सध्या तज्ज्ञांकडून तिचे समुपदेशन केले जात आहे. बिबवेवाडी परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांत गुन्हा

दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी स्वप्निल लांडे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या फरार भोंदूबाबाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन

श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या किळसवाण्या भोंदूगिरीमुळे समाजातील अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चमत्कार आणि दैवी शक्तीच्या भूलथापांना बळी पडून निरागस बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news