म. जक्की म. उस्मान कुरेशी pudhari photo
हिंगोली

Hingoli Political News : काँग्रेसचे कुरेशी ठाकरेंचे शिवबंधन बांधणार

आज मुंबईत प्रवेश, कळमनुरीचे राजकीय समीकरण बदलणार

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : गेल्या तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म. जक्की म. उस्मान कुरेशी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते रविवारी मुंबई येथील शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन बांधणार आहेत.

आखाडा बाळापूर, कळमनुरी, औंढा नागनाथ परिसरात मोठा जनसंपर्क असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जक्की कुरेशी मागील काही दिवसांपासून पक्षांतर करणार असल्याची चर्चा होती. कायम काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले कुरेशी यांचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रवेश निश्चित झाला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते आपल्या शेकडो समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

प्रवेशाची जोरदार तयारी सुरू झाली असून शनिवारी दुपारीच जक्की कुरेशी यांच्यासह कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघात दबदबा असलेले नेतृत्व म्हणून कुरेशी यांची ओळख आहे. त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदांची जबाबदारी सांभाळली. परंतू, पक्षाकडून म्हणावी तशी संधी दिली जात नव्हती. तसेच काही दिवसांपुर्वीच ठाकरे गटाला कळमनुरी विधानसभा मतदार संघात मोठे भगदाड पडले होते.

शिवसेना ठाकरे गटात भविष्यातील संधी व काम करण्याचा स्पेस बघता कुरेशी यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कुरेशी यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने मरगळ आलेल्या ठाकरे गटाला दिलासा मिळणार आहे.

  • कुरेशी यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे आखाडा बाळापूरसह कळमनुरी विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून कुरेशी यांची ओळख असल्याने भविष्यात ठाकरे गटाकडून त्यांना मोठी संधी दिली जाईल असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधील प्रभावशाली नेता म्हणून ओळख असलेल्या कुरेशी यांच्या काँग्रेसच्या सोडचिठ्ठीने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT