illegal parking Nanded : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस आणि मनपाची ‘संयुक्त’ कारवाई

अवैध पार्किंग : ५७ वाहनचालकांकडून ४१ हजारांचा दंड वसूल; साठे चौक ते व्हीआयपी रोड परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा
illegal parking Nanded
illegal parking Nandedpudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नांदेड शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेने कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील साठे चौक, आयटीआय कॉर्नर आणि व्हीआयपी रोड परिसरात विशेष संयुक्त कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अवैध पार्किंग करणाऱ्या ५७ वाहनचालकांवर कारवाई करत ४१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्गांवर हातगाड्या, टपऱ्या आणि बेशिस्त वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी वजिराबाद शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या पथकाने संयुक्तरीत्या ही धडक मोहीम राबवली.

illegal parking Nanded
Beed leopard sighting : गंगावाडी शिवारात दोनदा बिबट्याचे दर्शन!

कारवाईदरम्यान रस्त्यालगत वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण, हातगाड्या, फळविक्रेते आणि टपऱ्या हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. तसेच, ‘नो-पार्किंग’ आणि रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ५७ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वाहतूक शाखेचे अधिकारी, अंमलदार, आरसीपी पथक आणि मनपा कर्मचारी सहभागी झाले होते.

illegal parking Nanded
CM Pramod Sawant | गोव्यातील सर्व कार्यालयांसाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश; POSH कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.