हजरत सय्यद नुरोद्दीन नुरीबाबा  
हिंगोली

हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान : हजरत सय्यद नुरोद्दीन नुरीबाबा

हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान : हजरत सय्यद नुरोद्दीन नुरीबाबा

पुढारी वृत्तसेवा

सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान कळमनुरी शहरातील हजरत सै. नुरोद्दीन नुरी शहीद बाबाची दर्गाह सर्वच धर्मातील लोकांची श्रध्दास्थाने आहेत. येथील उरूस सुरू असून यावेळी मराठवाड्यातील काना कोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक नतमस्तक होण्यासाठी येतात. मोठ्या भक्तीने येणाऱ्या भाविकांच्या मनातील इच्छा, आकांक्षा, मनोकामना या ठिकाणी फलित होतात व नवसपूर्तीची हि दर्गाहमध्ये धूम असते.

हजरत सै. नुरोद्दीन नुरी शहीदचा दरबार लाखो श्रध्दाळूच्या श्रध्देचे प्रतीक येथे येणाऱ्या भक्तांची मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होते. नुरीबाबाच्या असिम कृपेने तृप्त भक्तांची हिंदू-मुस्लिम समाजाच्या लाखोंची संख्या मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात पहावयास मिळेल. हजरत नुरीबाबांच्या बाबत आख्यायिका आहे की, इतिहासात या भागात जुल्मी राजाची राजवट होती व या राजाची जनतेत प्रचंड दहशत होती. या जुल्मी राजापासून जनतेच्या रक्षणासाठी व इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी नुरीबाबाचे आगमन या भागात झाले. नुरीबाबा यांच्या सानिध्यात दिवसेंदिवस जनता येत असल्याने नुरीबाबांच्या भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसताच जुल्मी राजाने नुरीबाबा विरुध्द लढाई केली. या लढाईत मोठ्या निकराने नुरीबाबाने झुंज दिली.

लढताना कळमनुरीपासून पूर्वेला वाकोडी येथे नुरीबाबांच्या हाताची बोटे छाटली गेली. तशाच परिस्थितीत लढा देत ते कळमनुरीपर्यंत आले. येथे शत्रुने त्यांचे शिरच्छेद केले. पण नुरीबाबाने याही परिस्थितीत जुलमी राजाला ठार करून त्याची जुलमी राजवट संपविली. व इस्लाम धर्माचा प्रसार व लोकांना शांतता, मानवता व बंधूभावाचा संदेश दिला.

इस्लामी महिन्यानुसार मोहरची २१ तारीख रोजी त्यांची शहादत झाली. दरवर्षी त्यांचा उरूस या दिवशी भरविला जातो. उरूस दिवसेंदिवस यशोशिखरावर जात असून उरूस महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाशिवाय खेळ क्रीडाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही उरूस महोत्सव दरम्यान, अखिल भारतीय स्तरावर मुशायरा, कव्वाली, हास्य ड्रामा या शिवाय धार्मिक कार्यक्रम, अन्नदान व क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उरूस महोत्सवानिमित्त भव्य मेळाही भरविण्यात हजरत सरकार सय्यद नूरोनी नी शरीदी आला आहे.

शहरातील नागरिकांचा प्रचंड उत्साह स्वयंस्फूतीने आपापल्या भागात विद्युत रोषणाई, आकर्षक कमानी, पताके, सजावटीने संपूर्ण शहराला सजवून टाकणारा जोश, नुरी उरूस महोत्सव पार पाडण्यासाठी मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाज मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. मेळामध्ये आकाशपाळणे, सर्कस, विविध स्टॉल्स थाटले असून या भागात बालगोपाळ, महिला आदींची वर्दळ दिसत आहे.

- संकलन उमर फारूक शेख तालुका प्रतिनिधी, कळमनुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT