Hingoli News : सवना येथे ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

तीनच शिक्षक कार्यरत, विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान
hingoli news
Hingoli News : सवना येथे ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूपfile photo
Published on
Updated on

Hingoli News: Villagers lock the school at Savna

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची ९ पदे मंजूर असतांना प्रत्यक्षात तीनच शिक्षक कार्यरत असून या ठिकाणी तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. तर दुपारपर्यंत शिक्षण विभागाचा एकही अधिकारी शाळेकडे आला नाही. या प्रकारामुळे गावकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

hingoli news
Sambhajinagar News : वाकला जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

सेनगाव तालुक्यातील सवना येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शाळा आहे. याठिकाणी अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून शिक्षकांची केवळ तीनच पदे भरलेली असून या शिक्षकांनाच वर्ग सांभाळावे लागत आहेत.

त्यातही दोन शिक्षक मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात असल्याने एकाच शिक्षकावर सध्या शाळा सुरू आहे. रिक्तपदांमुळे शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. या ठिकाणी शिक्षकांची रिक्तपदे तातडीने भरावीत अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे शिक्षण विभागाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.

hingoli news
Beed News : पगार घाटेवाडीत, काम दुसऱ्या शाळेत! संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता शाळेला कुलूप ठोकले. यावेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रवीण नायक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील नायक, राजेश नायक, बालासाहेब नायक, शिवाजी नायक, बबन नायक, किशोर भालेराव, धनंजय वानखेडे, दीपक नायक यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, शाळेला कुलूप असल्यामुळे विद्यार्थी देखील अर्धातास वाट पाहून घरी निघून गेले. शाळेला कुलूप लावल्याची माहिती मिळाल्यानंतरही शिक्षण विभागाचा एकही अधिकारी शाळेकडे फिरकला नाही. या प्रकारामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षकांशिवाय कुलूप उघडले जाणार नाही

जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषद शाळेला कुलूप कायम होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news