E-KYC : १७ हजार शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित file photo
हिंगोली

E-KYC : १७ हजार शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित

हिंगोली जिल्ह्यातील चित्र, योजनेचा लाभघेण्याचे आवाहन- २७ हजार शेतकऱ्यांचा केवायसीला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

e-KYC pending for 17,000 farmers

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण 44 हजार 223 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अद्यापही 17000 लाभार्थी शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील 44 हजार 223 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 27 हजार 111 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर 17 हजार 966 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रलंबित ई-केवायसीपैकी 16 हजार 687 शेतकरी राष्ट्रीयकृत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व व्यापारी बँकांशी संबंधित आहेत.

यामध्ये एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी बँकांच्या शाखांमध्ये ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्रलंबित ई-केवायसीबाबत लाभार्थी शेतकऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT