An earthquake struck Hingoli district in the early morning; causing fear among the residents
आखाडा बाळापूर पुढारी वृत्तसेवा:
मंगळवारी पहाटे ५.५६ वाजता हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. ३.१० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू पांघरा शिंदे परिसरात असल्याची माहिती आहे.
मागील आक्टोबर महिन्यात 25 तारखेला दुपारी 3.30 वाजता 3.9 तीव्रता धक्का रामेश्वर तांडा सह जिल्हाभारत जाणवला होता या पूर्वी रामेश्वर येथून केंद्र बिंदू हदगांव तालुक्यातील सावरगाव येथे असल्याचे समजले होते पुन्हा आज हिंगोली जिल्ह्यात पांघरा शिंदे केंद्र बिंदू असल्याचे समजले.
कळमनुरी, औढा नागनाथ, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा व डोंगरकडा परिसरात हादरे जाणवले.
पहाटे साखर झोपेत असताना गूढ आवाजासह जमीन हलल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी सलग तीन वेळा हादरे जाणवले, अशीही माहिती पुढे आली आहे. या धक्क्यांमुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले असून पहाटेपासून रस्त्यावर गर्दी दिसून आली.
थंडीमुळे नागरिकांनी शेकोट्या पेटवून भूकंपाबाबत चर्चा केली. सुदैवाने आतापर्यंत जिवीत वा वित्तहानीची नोंद नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.