Hingoli News : तहसील कार्यालयात मांडला पत्त्यांचा डाव File Photo
हिंगोली

Hingoli News : तहसील कार्यालयात मांडला पत्त्यांचा डाव

कृषी मंत्र्यांचा केला निषेध, ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Agriculture Minister's protest Thackeray group's statement administration

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा: कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी विधानसभेत चक ऑनलाईन रम्मी खेळण्यात मश्गुल असल्याचे उभ्या महाराष्ट्राने बघितले. याचा सोमवारी सेनगावात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनासोबत रम्मी खेळण्याचे साहित्य देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्रभर शेतकरी अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. सततची नापिकी पावसाचा लहरीपणा कर्जाचा डोंगर आणि जीवन जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. परंतु जिथे जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात जिथे बसून कशाप्रकारे शेतकऱ्याला मदत करता येईल याची आराखडे बांधले जातात. त्या विधान भवनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चक्क ऑनलाईन रमी खेळण्यात मश्गुल असल्याचे उभ्या महाराष्ट्राने बघितले.

एक प्रकारे मोठ्या आशेने सरकारच्या मदतीची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्याची घोर निराशा झाली जनमानसातून याचे तीव्र संतप्त पडसाद उमटत आहेत. सोमवारी सेनगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात कृषी मंत्र्यांचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना निवेदनासोबत जुगाराचे साहित्य देण्यात आले.

तहसीलदार यांच्या दालनात शिवसैनिकांनी प्रतीकात्मक जुगार खेळ मांडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर, युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश पाटील, शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रवीण महाजन, देविदास कुंदर्गे, जीवन देशमुख, संकेत पठाडे, वैभव देशमुख, विलास सुतार, अनिल गिते आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातही आंदोलन

हिंगोली : जिल्ह्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते खेळून निषेध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुध्द ठाकरे गटातून संतापाची लाट उसळली आहे.

ठाकरे गट अधिकच आक्रमक झाला. कभी किसानों के सवालों पर ध्यान दो ना महाराज, गरीब किसानों के खेतोंपर आवो ना महाराज असे बॅनर लावून तुम्हाला रम्मी खेळण्यासाठी वेळ कसा मिळतो असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपू पाटील सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड, विठ्ठल चौतमल, वसीम देशमुख, आनंदराव जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते खेळून आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT