जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट आणि भ्याड हल्ल्यात गोरक्षकाचा मृत्यू या घटनेच्या निषेधार्थ आज (दि. २३) जवळाबाजार येथील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
पानटपरी, भाजीपाला, हॉटेल, छोटे व्यावसायिक, व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. जवळाबाजार बाजारपेठ सकाळपासूनच कडकडीत बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
समस्त हिंदू समाज आणि शिवप्रेंमी यांनी जवळाबाजार बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. सर्वांनी प्रतिसाद देत १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.
हेही वाचा