मराठवाडा

Hingoli Crime News : पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरण: तरुणीला अटक, धागेदोरे हाती लागणार ?

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :  भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. तिला शनिवारी (दि.५) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार  (Hingoli Crime News) झाला होता.

या प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय इंदोरिया, ओम पवार फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. त्यांची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणाही पोलिसांनी केली आहे. या शिवाय पोलिसांची तीन पथकेही त्यांच्या मागावर आहेत. या पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून तपासणीदेखील केली  (Hingoli Crime News) आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरमकर, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने एका 22 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. त्या तरुणीला या घटनेची संपूर्ण माहिती असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तिला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे तिच्याकडून या प्रकरणात महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या सोबतच सायबर सेलच्या माध्यमातून आरोपींच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले जात असून घटनेपूर्वी त्यांना कोणी व किती वेळा कॉल केले, तसेच मेसेज देखील तपासले जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT