मराठवाडा

Hingoli Crime News : किरकोळ वादातून पत्नीचा गळा आवळून खून; पतीला अटक

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डिग्रस कर्‍हाळे येथे पत्नीसोबत वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली. त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून (Hingoli Crime News) केला. ही धक्कादायक घटना आज (दि.७) सकाळी उघडकीस आली. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. योगीता संतोष कर्‍हाळे (वय २८) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत तालुक्यातील सोन्ना येथील योगीता यांचा विवाह १० वर्षापूर्वी डिग्रस कर्‍हाळे येथील संतोष बळीराम कर्‍हाळे याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले होते. दरम्यान, शनिवारी संतोष याची आई दोन लहान मुलांसह नातेवाईकांकडे लग्नाला गेली होती. तर वडील शेतात कामासाठी गेले होते. त्यामुळे रात्री घरी संतोष व त्याची पत्नी योगिता दोघेच होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाले. या वादामध्ये संतोष याने योागिता यांच्या गळ्यावर लाथ मारली. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर त्याने दोरीने योगिता यांचा गळा आवळून खून  (Hingoli Crime News) केला. आणि तो रात्रभर मृतदेहाजवळच होता.

दरम्यान, आज सकाळी त्याने सोन्ना येथे योगिता यांच्या माहेरी संपर्क साधून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, तिचा खूनच झाल्याच्या संशयावरून योगिताच्या माहेरच्या लोकांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मगन पवार, जमादार विकी कुंदनानी, शेख महमद, रामराव चिभडे, आकाश पंडितकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT