मराठवाडा

हिंगोली : शेततळ्यात पडून बहीण भावाचा मृत्यू

अविनाश सुतार

सेनगाव : पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिन गाळे गावातील ऊसतोड मजुराच्या मुलगा आणि मुलगीचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे रविवारी (दि.२२) घडली. दोघांच्या पार्थिवावर आज (दि.२३) बोरखेडी पिन गाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रावण आसाराम चव्हाण व यांचे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी ऊस तोडीच्या कामासाठी गेले होते. २२ जानेवारीरोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चव्हाण व त्यांची पत्नी ऊस तोडून गाडी भरण्याचे काम करत होते.

त्यांची लहान मुले प्रतीक्षा श्रावण चव्हाण (वय 7) आणि तिचा भाऊ पृथ्वीराज श्रावण चव्हाण हे शेतात खेळत होते. अचानक प्रतीक्षा ही चिमुरडी खेळता – खेळता शेततळ्यात पडली. तिच्या मागे तिचा भाऊ पृथ्वीराज हा देखील शेततळ्यात पडला. यामध्ये या दोन्ही चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर चव्हाण दाम्पत्याने शेततळ्याकडे धाव घेतली.

करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचा मृतदेह मूळ गावी बोरखेडी येथे आणण्यात आला. येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT