हिंगोली : भाटेगाव येथे ट्रॅव्हल्स- मोटरसायकल अपघातात एक ठार | पुढारी

हिंगोली : भाटेगाव येथे ट्रॅव्हल्स- मोटरसायकल अपघातात एक ठार

वारंगा फाटा; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारामध्ये गुरुवारी (दि.19) सायंकाळी साडेसहा वाजता नांदेड कडून येणारी ट्रॅव्हल्स व भाटेगावकडे जाणाऱ्या मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात  मोटरसायकलवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मोटरसायकलस्वार गजानन देविदास लोमटे (वय 32) व शेख सलीम (वय 50) हे दोघेजण गुरुवारी आठवडा बाजार करण्याकरता वारंगा फाटा येथे गेले होते. बाजार करून डोंगरकडाकडे परत येते वेळेस भाटेगाव शिवारामध्ये ओव्हरटेक करताना मोटरसायकल व ट्रॅव्हलची समोरासमोरा धडक होऊन अपघात झाला. यावेळी मोटर सायकलस्वार गजानन लोमटे हे गंभीर अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी डोंगरकडा इथून नांदेडला हलवले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेख सलीम यांना गंभीर मार असल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरता नातेवाईकांनी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

हेही वाचा;

Back to top button